वाक्प्रचार : आ

आकाश कोसळून पडणे
भयंकर आपत्ती येणे
आकाशाची चौघडी करणे
अशक्य गोष्ट करणे
आग पाखडणे
एखाद्यावर अतिशय रागावणे
आग रामेश्वरी,बंब सोमेश्वरी
एकीकडे दुखणे व दुसरीकडे उपचार
आडपडदा न ठेवणे
मनमोकळेपणाने वागणे
आडमाप पैसा खर्च
अवाढव्य खर्च
आडव्या हाताने घेणे
खरडपट्टी काढणे
आडव्या हाताने देणे
लाच देणे
आडव्यात शिरणे
विषयांतर करणे
आतड्याला पीळ पडणे
एखाद्याबद्दल अत्यंत कळवळा येणे
आतबट्ट्याचा व्यापार
नुकसान सोसून केलेला धंदा
आपली तुंबडी भरणे
स्वतःचे हित साधणे
आपले गुण पाघळणे
आपल्या मुर्खपणाने एखादे कार्य बिघडवणे
आपले घोडे पुढे ढकलणे
आपलेच काम तेवढे प्रथम घेणे
आपले घर भरणे
स्वार्थ साधणे
आपल्या भोवती दिवा ओवाळणे
स्वतःच स्वतःची प्रशंशा करणे
आंबट चेहरा करणे
नावड , निरूत्साह
आसन डळमळणे
स्थान अस्थिर होणे
आळा घालणे
बंधन घालणे , नियंत्रण करणे
आज्ञा देणे
निरोप देणे , परवानगी देणे