शब्दार्थ


शब्दार्थ :-1
अटवी
अरण्य ,वन ,जंगल ,कांतार
अडणी
शंख ठेवण्याचे उपकरण,तिवई
अतर्क्य
तर्क करण्यास कठिण ,गहन
अतीत
पलीकडे गेलेला
अदमोरे / अदमुरे
अर्धवट विरजलेले , अर्धवट मुरलेले
अदम्य
दुर्दम्य ,अनावर ,अनियंत्रित
अद्री
गिरी ,पर्वत ,डोंगर
अद्वैत
ऐक्य ,एकता ,एकरुपता ,तादात्म्य
अनघ
निष्पाप ,निरागस ,निर्मळ ,पवित्र
अनर्गळ
स्वैर ,मोकाट ,स्वच्छंदी ,अनिर्बंध
अनन्वय
पर्याय नसणे,जोड नसणे
अनृत
लबाडी ,खोटेपणा
अपलाप
विपर्यास ,विकृती
अप्रतिहत
अखंड ,अव्याहत
अभ्यवेक्षण
प्रसिध्दीपूर्व लेखन
अश्र्वत्थ
पिंपळ
असू
प्राण ,जीव
आसव
अर्क ,रस,सार
आसावणे
इच्छा करणे
गुलजार
नाजूक ,सुंदर ,मोहक
चखोट
शुद्ध ,निर्मळ ,चोख
चंद्रमौळी
डोक्यावर चंद्रकोर असलेला शंकर
छिद्रान्वेषी
दुसऱ्याचे केवळ दोष पाहणारा
ज्योत्स्ना
चांदणे ,चंद्रप्रकाश
झिम्मड
पावसाची झड ,गर्दी ,झुंबड
टारफुला
पीकनाशक तण
तर्जूमा
भाषांतर ,अनुवाद ,सारांश
तितिक्षा
सहनशीलता ,सोशीकता
तिरीमिरी
भोवळ ,घेरी ,चक्कर
तांडेल
नावाडी ,मुख्य खलाशी
तुरंग
घोडा ,अश्र्व
तोय
पाणी ,जल
थंडी फराळ
उपासमार
दग्ध
जळलेला , भाजलेला
दयिता
पत्नी ,बायको
दिवाभीत
घुबड ,चोर ,दरोडेखोर
दुस्तर
पार करण्यास किंवा तरुन जाण्यास कठीण
देवडी
चौकी ,ठाणे
देवडीवाला
चौकीदार,पहारेकरी
द्राविडी प्राणायाम
सरळ व साध्या गोष्टीत विनाकारण केलेली गुंतागुंत
धर्ती
शैली ,प्रकार ,नमुना
धी
बुद्धी ,मती ,विवेकशक्ती
धृती
धैर्य ,निर्धार ,धाडस

शब्दार्थ :-2
निदीध्यास
अहोरात्र घेतलेला ध्यास
निधान
ठेवा ,संचय ,खजिना
निमग्न
गढलेला  , रमलेला
निहीत
सुप्त , गर्भित
निक्षेपण
साठवण ,ठेवण
नेढे
सुईचे छिद्रे
नेत्रपल्लवी
नजरेची भाषा ,नेत्र संकेत
पुच्छप्रगती
पीछेहाट
पय
दुध , पाणी
पृथगात्म
वेगळेपण असणारा
पयोधर
मेघ
पयोधी
समुद्र
परिशीलन
बारकाईने केलेला किंवा सुक्ष्म अभ्यास
परिष्करण
संस्कारण , सुधारणा
पर्णवृंत
पानाची देठ
पर्यालोचन
विशेष अवलोकन ,समीक्षण
पलाण
खोगीर
पागोळी
तारेवरुन किंवा छपरावरून पडणारे थेंब
पांजरपोळ
गोशाळा
पाटव
कौशल्य ,चातुर्य ,नैपुण्य
फटिंग
एकांतप्रिय ,एकलकोंडा
बंदिशी
बांधणी , रचना
बुभुक्षित
भुकेला
बुज
कदर , आदर
भकल
नाराळचा अर्धा भाग
भातुके
लहान मुलांचा खाऊ ,अल्पोपहार
भृतकुटी
भुवई
मखरवी
खोच , खुबी , इंगित
मंजुषा
पेटी
मानबिंदू
अभिमानाचा विषय
मुमुर्ष
मरणप्राय , मृत्युवश
मुमुक्षू
मोक्षाची इच्छा करणारा साधक
मृगेंद्र
पशुंचा राजा , सिंह
मेधावी
बुध्दिमान , प्रज्ञावंत
मोतद्दार
घोड्याची निगा राखणारा
मोरचेल
मोरपिसांची चवरी
यदृच्छा
योगायोग , अनासाये घडणारे
यावच्चंद्रदिवाकरौ
चंद्रसूर्य आहेत तो पर्यंत , चिरकाल , शाश्वत
युगांतर
परिवर्तन
रूंजी
भुंग्याचे गुणगुणणे , गुंजारव
रौरव
नरक
ही
लज्जा , संकोच
लाहो
ध्यास , ओढ ,आस
लुब्रा
लाळघोट्या , चोंबडा
लोलुप
आसक्त , लोभी , हावरट , आधाशी
वल्कल
झाडाच्या सालीचे वस्त्र
वाक्ताडन
शाब्दिक प्रहार , अपमानकारक बोलणे
विभ्रम
अलंकार , मोहक रूप किंवा लिला
विलसणे
शोभणे , खुलून दिसणे
विलोल
अस्थिर , चंचल , तरल
विश्रब्ध
विसावलेला , निर्भय
विहंगमावलोकन
वरवरचे पाहणे , स्थूल निरीक्षण
विज्ञापना
विनंती
वीतराग
विरक्त , अनासक्त
वैखरी
वाणी , भाषा , वाचा , बोल
शं
कल्याण , सुखसमृद्धी
शबल
अशुद्ध , प्रदुषित
शलाका
सळई , टाचणी , बारिक खिळा
शल्क
खवला
शहाजोग
भरवशाचा , आव आणणारा , पत असलेला
शार्दुल
वाघ
शिखा
वरचे टोक , शेंडा
शुक
पोपट , राघू , रावा
षटकर्णी
अनेकांना कळलेली , वाच्यता झालेली
सचिंत
चिंता करणारा , काळजीग्रस्त
सचैलस्नान
वस्त्रासह केलेले स्नान
क्षुप्ण
तुडवलेला , मळलेला