वाक्प्रचार : अ


अंग झाडून मोकळे होणे
आपला काही संबंध नाही असे दाखवणे
अंग काढणे
माघार घेणे
अंगाचा तिळपापड होणे
अतिशय राग येणे
अंगाचे पाणी करणे
अत्यंत परिश्रम करणे
अंगावर काटा उभा राहणे
भीतीने अगर आनंदाने अंग रोमांचित होणे
अंगठा दाखविणे
नकार देणे , फसविणे
अटकेपार झेंडे लावणे
अतिशय मोठे कार्य करणे
अंत पाहणे
कसून परीक्षा घेणे
अंत लागणे
शेवट दिसणे ,सर्व समजणे
अंत:करणात घर करून बसणे
अत्यंत विश्वासू होणे
अंतर्यामी रडणे
मनातल्या मनात तळमळणे
अत्तराचे दिवे जाळणे
अतिशय उधळपट्टी करणे
आभाळ फाटणे
सर्व बाजूंनी एकदम संकट येणे
अरण्य पंडित
जेथे मुळीच मनुष्यवस्ती नाही अशा ठिकाणी ज्याची विद्वत्ता दिसते असा मुर्ख मनुष्य
अवसान तुटणे – सुटणे
धीर खचणे
अवळ्यांची मोट बांधणे
एखादी दु:साध्य गोष्ट करु पाहणे
अवाक्षर बोलणे
एक ब्र हि तोंडावाटे ( न ) काढणे
अळवावरचे पाणी
क्षणभंगुर गोष्ट