पर्यावरण प्रकल्प यादी

इ.12 वी साठी पर्यावरण प्रकल्प यादी
1.सेंद्रिय शेती करणाऱ्या एकाद्या शेतकऱ्याला भेट द्या. त्याच्या कडून खालील माहिती घेऊन एक अहवाल तयार करा. शेतात वापरलेल्या कंपोस्ट/ जैविक खतांचा प्रकार रासायनिक खतांच्या तुलनेत जैविक खतांची किंमत वापरलेल्या जैविक कीडनाशकांची माहिती आणि त्याचे घटक 
२. इंटरनेट वरून कार्बन ठसा गणनयंत्राच्या मदतीने तुमचा कार्बन ठसा किती आहे ते शोधून काढा . नंतर तुमचा ठसा कमी करण्यासाठी कोणती पावले उचलू शकता त्याची यादी करा. हे उपाय केल्यावर पुन्हा कार्बन ठसा किती आहे ते काढा. यावर एक अहवाल तयार करा. 
३. तुमच्या परिसरातील घन कचऱ्यांची विल्हेवाट कशी लावली जाते या बद्दल एक प्रकल्प तयार करा. कचरा कमी करून समुदायातील कचरा व्यवस्थापन सुधारता येण्यासाठी पोस्टर बनवा. 
४. पुस्तकात दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवरून तुमच्या घराचे ऊर्जा लेखापरीक्षण करा. ऊर्जेचा वापर कमी कसा करता येईल याचे उपाय लिहा. तुमच्या लाईट बिलाचा हे उपाय करण्याआधी आणि नंतर अभ्यास करा. हाच तुमच्या प्रकल्पाचा निष्कर्ष असेल.
५. तुमच्या जवळच्या रुग्णालय/डॉक्ट च्या दवाखान्याला भेट द्या. डॉक्टर ना विचारण्यासाठी एक प्रश्नावली तयार करा. त्यात खालील मुद्दे समाविष्ट करा. पेशंट च्या संख्येत वाढ झाली का घट , कोणते आजार नोंदवले गेले .या आजारांची कारणे काय आहेत ,प्रतिबंधासाठी कोणते उपाय करता येतील या सर्वाचा एकअहवाल तयार करा.
 ६. तुमच्या गाव, तालुका, शहर, मधील मागील २० वर्षांच्या लोकसंख्येचा अभ्यास करा. (कारण जनगणना दर दहा वर्षांनी होते.) ही आकडेवारी भारत सरकारच्या वेबसाईट (htpp://censusindia.gov.in) वर उपलब्ध आहे. लोकसंख्येतील बदल आलेख काढून दाखवा आणि वर्गात याची चर्चा करा. 
 ७. घरातील किंवा शेजारील ज्येष्ठ लोकांशी बोलून तुमच्या समुदायातील स्थानिक परंपरांचा अभ्यास करा. त्यातील पर्यावरण संरक्षणाला अनुकूल असलेल्या प्रथा अधोरेखित करा. 
८. स्थानिक किराणा दुकान किंवा मॉल ला भेट द्या. तेथे उपलब्ध असलेल्या इको लेबल असलेल्या वस्तूंची यादी करा. यांना पर्यावरणस्नेही का म्हटले जाते ?उत्पादनाचे नाव,किंमत आणि कंपनी चे नाव असा एक तक्ता तयार करा. हि उत्पादने सेंद्रीय असू शकतात.
९. कोणत्याही एका निसर्ग पर्यटन स्थळाला भेट द्या. लोक तेथे का जातात? दरवर्षी किती लोक या ठिकाणी येतात?या पर्यटनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या प्रभावांची यादी करा . हे टाळण्यासाठी उपाय सुचवा. 
१०. पुस्तकात दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे तुमच्या कॉलेज/शाळेचे हरित लेखापरीक्षण करा.
११. तुमच्या परिसरातील घन कचरा जेथे टाकला जातो त्या ठिकाणाला भेट द्या. तेथे रोज किती कचरा टाकला जातो, त्याचे आजूबाजूच्या वातावरणावर कसे परिणाम होतात याचा अहवाल तयार करा. त्या परिसरात राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या मुलाखती घ्या. कचरा टाकण्यामुळे त्यांच्यावर सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम काय झाले ते विचारा. (कचरा कमी करण्यासाठीचे उपाय सुचवणारे पोस्टर तयार करा.) 
१२. मागील वर्षात तुमच्या परिसरात तुम्हाला आणि इतरांना जाणवलेल्या हवामान बदलांची नोंद करा. यामुळे तुमच्या पर्यावरणावर आणि बजेटवर काय परिणाम झाले त्याचा अहवाल तयार करा.तुमच्या भागातील पाण्याच्या स्थानिक स्त्रोतांचे आणि त्यातील पाण्याच्या गुणवत्तेचे सर्वेक्षण करा. (पुस्तकातील मार्गदर्शक तत्वे वापरा) पाण्याच्या प्रदूषणाची कारणे लिहा आणि त्यासाठी घेण्यात येणारे प्रतिबंधात्मक उपाय सुचवा. 
१४. तुमच्या भागातील कूप नलिकांच्या पाण्याच्या गुणवत्तेचा अभ्यास करा. कूप नलिकेचे ठिकाण आणि त्याच्या प्रदूषणाची कारणे असा एक तक्ता तयार करा. कूप नलिकेच्या पाण्याची गुणवत्ता कधीपासून बदलली? यांचे पाणी वर्षभर राहते का काही काळ राहते? याची माहिती त्या भागातील ज्येष्ठ माणसांकडून घ्या. यात सुधारणा करण्यासाठी तुमच्या सूचना लिहा. 
१५. स्थानिक उद्योगाला भेट द्या आणि त्याच्या.भोवतालच्या पर्यावरणावरील परिणामांचा अभ्यास करा. स्थानिक लोकांच्या मुलाखती घ्या आणि त्यांचे उद्योगाविषयी काय मत आहे ते जाणून घ्या. 
१६. तुमच्या भागातील पर्जन्यजल संचयन साठी असलेल्या प्रणाली चे सर्वेक्षण करा. यामुळे त्या भागाला झालेल्या फायद्यांची यादी करा. 
१७. तुमच्या भागातील कमीत कमी पाच शेतांना भेट द्या. अलीकडील काही वर्षात तेथे कीटकांमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा अभ्यास करा. पिकाचे नाव, रोगाचा प्रकार, झालेले आर्थिक नुकसान, शेतकऱ्याच्या मते या समस्येची कारणे असा तक्ता तयार करा.
१८. तुमच्या भागातील मिश्र पीक शेती चा अभ्यास करा. यामध्ये पिकांचा क्रम,त्याचे फायदे, लावलेल्या प्रजातींचे प्रकार,त्या प्रत्येक पिकाचे शेतकऱ्याला होणारे आर्थिक तसेच पिकाची गुणवत्ता आणि प्रमाण याच्या संबंधित फायदे हे मुद्दे विचारात घेऊन अभ्यास करा. 
१९. तुमच्या भागातील विविध तणांची माहिती मिळवण्यासाठी शेतांना भेट द्या. तणांनी व्यापलेला भाग दाखवणारा नकाशा तयार करा. या तणांचा शेतीवर कसा परिणाम झाला आहे हे स्थानिक शेतकऱ्यांना विचारा . याचा तक्ता बनवा. तण कमी करण्यासाठी रसायने न वापरता नियंत्रणाचे उपाय लिहा. 
२०. तुमच्या विभागातील पाणी जतन करण्याच्याविविध पद्धतींचे सर्वेक्षण करा. या प्रकल्पाचे लोकांना होणारे फायदे लिहा. ही पद्धत ठिबक सिंचन ,शहरात छपरावरील जलसंधारण किंवा ग्रामीण भागात पाणलोट क्षेत्र विकास यापैकी असू शकते. 
२१. तुमच्या भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा अभ्यास करा. पिण्याच्या पाण्याचा स्रोत कोणता आहे, पाणी कोठे शुद्ध केले जाते आणि ते परिसरात कसे वितरित केले जाते, तसेच सांडपाण्याचा निचरा कसा होतो या मुद्द्यांचा समावेश करा. 
२२. स्थानिक किंवा जवळच्या धरणाचा अभ्यास करा,धरण आणि परिसर यांच्याशी संबंधित पर्यावरणाचे मुद्दे लिहा. 
२३. AQI हे अँप वापरून तुमच्या भागातील हवा प्रदूषणाचा अभ्यास करा. प्रत्येक आठवड्याला एक , असे एक महिना हे निरीक्षण करा.तुमच्या निरीक्षणावर आधारित निष्कर्ष काढा.
२४. साऊंड लेवल अँप वापरून क्षेत्रातील ध्वनी प्रदूषणाचा अभ्यास करा.बाजार, शाळा,रुग्णालयआणि वाहतूक सिग्नल या ठिकाणची ध्वनी पातळी मोजा. याचा तपशीलवार अहवाल तयार करा. (ध्वनी पातळी आणि त्याचे धोकादायक परिणाम कमी करण्याचे उपाय सुचवणारे पोस्टर तयार करा.)
२५. तुमच्या शाळा किंवा कॉलेज च्या परिसरातील जैव-विविधतेचे सर्वेक्षण करा. इको लेखा परीक्षणाचा अहवाल बनवा. 
२६. तुमच्या गाव/शहर मधील पर्यावरणाच्या समस्या खालील मुद्द्यांना धरून लिहा. लोकसंख्या वाढ, घन कचरा समस्या, प्रदूषण, जैव -विविधतेचे दस्त ऐवज तयार करणे/ लिखित स्वरूपात ठेवणे.
२७. जवळच्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्या (किल्ला) व खालील माहिती लिहा. किती लोक रोज भेट देतात , त्यांचा भेटीचा हेतू , त्या ठिकाणचे ऐतिहासिक महत्व,आणि तेथील पर्यावरणाचे मुद्दे. 
२८. तुमच्या भागातील पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या संस्थेबद्दल आणि त्यांनी गेल्या काही वर्षात केलेल्या कामाबद्दल माहिती लिहा. 
२९. भारतातील आदिवासी समूहांची राज्यनिहाय यादी तयार करा. प्रत्येक समूहाची खास वैशिष्ठ्ये स्पष्ट करा. आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरांचे वर्णन करा. 
३०. जवळच्या भागातील पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनासाठी वापरलेल्या तंत्रज्ञनाचा अहवाल बनवा. या तंत्रज्ञानांचे महत्व स्पष्ट करा. 
३१. रासायनिक कीडनाशकांच्या वितरकाला भेट द्या. त्या भागात नेहमी वापरल्या जाणाऱ्या कीडनाशकांची तपशीलवार यादी करा. ती कोणत्या पिकांसाठी वापरतात ते लिहा. त्या कीडनाशकांचे मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे 
पारिणाम लिहा.