जर्नल कार्य


जर्नल कार्य
   विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रकरणातील एक या प्रमाणे एकूण 5 जर्नल कार्य करणे आवश्यक आहे.
प्रकरण 1. मानव आणि पर्यावरण
1. लोकांच्या स्थलांतराला जबाबदार असणारे घटक स्पष्ट करा. 
 2. देवरायांचे महत्‍त्व स्पष्ट करा. 
 3. तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही कोणत्या पर्यावरणपूरक पद्धती अंगिकारू शकता ते लिहा. 
 4. लोकसंख्येचा मनोरा (पिरॅमिड) एखाद्या देशाचे लोकसंख्या शास्त्र कसे स्पष्ट करतो ?
 5. पर्यावरणाचे कोणते वेगवेगळे घटक मानवी आरोग्यावर परिणाम करतात ?
 6. पर्यावरणाची नीतिमूल्ये एका उदाहरणासह स्पष्ट करा. 
 7. मानव व पर्यावरण यांच्या शाश्वत भविष्‍यासाठी कोणत्‍या सुधारणा सुचवाल?
प्रकरण 2.पर्यावरणीय प्रदूषण
 1. तुमच्या परिसरातील पर्यावरणीय समस्‍या स्‍पष्‍ट करा.तुमच्या घरापासून ते तुमच्या भागात तो कचरा जिथे जातो.   
   तेथपर्यंतचा सुक्या कचऱ्याचा प्रवास, लिहून काढा 
 2. प्लास्टिक आणि ई-कचरा यांच्या पुनर्चक्रीकरणाचे नियम लिहा. 
 3. ध्वनी प्रदूषणाचे स्रोत कोणते आहेत? ते कमी करण्याचे उपाय स्पष्ट करा . 
 4. जागतिक तापमानवाढ म्हणजे काय? ती कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
 5 भारतातील महानगरांतील हवा प्रदूषणाचे स्रोत कोणते? उदाहरणांसह स्पष्ट करा. 
 6. हवामान बदलाचे परिणाम स्‍पष्‍ट करा. 
 7. जीवाश्म इंधनाच्या वापराबाबतच्या समस्‍या स्‍पष्‍ट करा.
8. शेतीसाठी वापरली जाणारी खते व त्‍यांचे परिणाम स्‍पष्‍ट करा.
प्रकरण 3. शाश्वत विकास
1. विकास आणि शाश्वत विकास यात काय फरक आहे? योग्य उदाहरणे देऊन स्पष्ट करा. 
2. नेहमी वापरली जाणारी रासायनिक कीटकनाशके आणि खते यांचा एक तक्‍ता तयार करा. त्यांचे मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम लिहा. 
 3. राळेगण सिद्धीची यशोगाथा त्यांनी साध्य केलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्‍टांसहित लिहा. 
 4. शाश्वत जीवनशैलीसाठी व्यक्तीची आणि समूहाची भूमिका स्‍पष्‍ट करा. 
 5. शाश्वत शेतीची तत्‍त्वे कोणती आहेत ते सांगा. त्यातील कोणतीही २ स्पष्ट करा. 
 6. भारतात लागवड करण्यात येणाऱ्या काही बी.टी. वाणांची माहिती लिहा.
 7. शाश्वत विकासाच्या दृष्‍टीने भारतात राबविल्‍या जाणाऱ्या योजनांची माहिती लिहा.
 8. शाश्वत विकासाच्या ध्येयांची नोंद करा. यांपैकी आपल्‍या परिसरात कोणती ध्येये साकारली जात आहेत व कसे, याचे स्‍पष्‍टीकरण द्या.
प्रकरण 4.पर्यावरण संरक्षण पद्धती
1. हरित इमारतींसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते स्पष्ट करा. 
 2. उद्योगांमुळे पर्यावरणावर कोणकोणते परिणाम होऊ शकतात ते स्पष्ट करा 
 3. इको लेबलिंग म्हणजे काय? त्याचे फायदे कोणते आहेत?
 4.भारतातील पर्यावरण मंजुरी ची प्रक्रिया स्पष्ट करा. 
 5. पॅरिस कराराबद्दल माहिती द्या.
 6. पाणथळ जागांच्या संवर्धनाच्या दृष्टीने रामसर साइटचे महत्व नमूद करा.
 7. उपभोक्‍ता शिक्षणाची गरज व महत्‍त्‍व स्‍पष्‍ट करा.
 8. पर्यावरणपूरक पद्धती आणि पर्यावरणपूरक पर्यटन स्‍पष्‍ट करा.
 प्रकरण 5.जल सुरक्षा
 1. पूर येण्याची कारणे आणि त्याचे परिणाम स्पष्ट करा. पूर परिस्थिती टाळण्यासाठीचे सुधारात्मक उपाय सुचवा.
2.पाण्याचे संवर्धन आणि त्याचे महत्‍त्व स्‍पष्‍ट करा.  3. एकाद्या पर्यटनस्थळाला भेट देताना पर्यावरणावरील परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या खबरदाऱ्या घेतल्या पाहिजेत ते लिहा. 
4. भारतातील पाण्याची टंचाई स्‍पष्‍ट करा. 
5. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे महत्‍त्व स्‍पष्‍ट करा. 
6. भारतातील नद्यांचे प्रदूषण व उपाय योजना स्‍पष्‍ट करा. 
 7. तुमच्या परिसरातील पाणी प्रदूषण होण्याच्या
कारणांचा अभ्‍यास करून उपाययोजना सुचवा.
 8. तुमच्या परिसरात जलसुरक्षेसाठी कोणत्‍या
उपाययोजनांची गरज आहे व का याचे स्‍पष्‍टीकरण
द्या.