प्र.1 राज्यशास्त्र
1991 नंतर जग ( भाग 1)
1991 नंतर जग ( भाग 1)
नोव्हेंबर १९८९ मध्ये बर्लिनची भिंत पडली आणि सोव्हिएट रशियाच्या विघटनाची सुरुवात होऊन अखेरीस शीतयुद्धाचा काळ समाप्त झाला. अशा प्रकारे अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यामधील वर्चस्वाच्या लढाईवर आधारित पूर्व-पश्चिम वादही यामुळे संपुष्टात आले.शीतयुद्धोत्तर काळातील घटना व घडामोडींचा आढावा पुढील पाच मुख्य परिमाणांद्वारे घेता येईल.
(i) शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय : शीतयुद्धाच्या समाप्ती नंतर अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या दोन महासत्तांनी व्यापलेली आंतरराष्ट्रीय व्यवस्था संपुष्टात आली. याच काळात सोव्हिएट रशियाचे विघटन होऊन नवीन राष्ट्रे उदयास आली.
(ii) एकध्रुवीयतेचा उदय : अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यामधील शीतयुद्ध संपल्याने द्विध्रुवीयता संपुष्टात येऊन अमेरिकेचे वर्चस्व असलेली एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था उदयास आली.
(iii) मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप : मानवी हक्का विषयी जागृती होऊन मानवतावादी दृष्टिकोनातून झालेल्या हस्तक्षेपांमध्ये वाढ झाली.
(iv) दहशतवाद : 11 सप्टेंबर 2001 ला अमेरिकेविरुद्ध झालेल्या हल्ल्यानंतर (ज्याला 9/11 हल्ला म्हणून ओळखले जाते) दहशतवादाचे स्वरूप बदलत गेले.
(v) बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद : या काळात मुख्यतः चीन आणि भारत या राष्ट्रांचा प्रभाव वाढला, इंडो-पॅसिफिक प्रदेशाचे प्रस्थ वाढले आणि व्लादिमीर पुतीन यांच्या अध्यक्षतेखाली रशियाचाही उदय झाला. या घडामोडींबरोबरच प्रादेशिकतावादाचा विकास झाला ज्यामुळे बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात येऊन प्रदेश आणि प्रादेशिक संस्थांचे महत्त्व वाढत गेले.
1989 मधील पूर्व युरोपातील क्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये दोन महत्त्वाचे प्रवाह आढळतात. पहिला म्हणजे स्वयंनिर्णयांच्या हक्कांवर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह आणि दुसरा म्हणजे द्विध्रुवीयतेचा अस्त. अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या दोन महासत्ता अस्तित्वात असल्यामुळे द्विध्रुवीयता अबाधित होती.सत्तेच्या या दोन केंद्रांमध्ये जग विभाजित झाले होते. सोव्हिएट रशियाच्या विघटनामुळे एक महासत्ता लोप पावली आणि जगात द्विध्रुवीयता नष्ट झाली.पूर्व युरोपीय राज्यांमधील क्रांती ही तेथील मध्यमवर्गाच्या वाढत्या अपेक्षांमधून निर्माण झाली होती. अधिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य मिळावे अशी त्यांची इच्छा होती म्हणूनच सोव्हिएट प्रणित साम्यवादी शासनांविरुद्ध त्यांनी उठाव केला. तेथे स्वतंत्र लोकशाही राज्ये उदयास आली. सोव्हिएट रशियाच्या अंतर्गत राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चळवळी उदयास आल्या. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांनी अधिक स्वायत्ततेसाठी आग्रह धरून कालांतराने स्वातंत्र्याची मागणी केली. यादरम्यान विविध प्रदेशांतील लोकसमूहांच्या वांशिक अस्मिता प्रबळ होऊ लागल्या होत्या. यामुळे वांशिक अस्मितेवर आधारित स्वतंत्र राष्ट्र निर्मितीच्या मागण्या होऊ लागल्या.
याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -
■ युरोपमध्ये नवीन राष्ट्रे खालीलप्रमाणे निर्माण झाली.
★ चेकोस्लोव्हाकियाचे ‘चेक गणराज्य’ आणि ‘स्लाव गणराज्य’ या दोन राष्ट्रांमध्ये विभाजन झाले.
★ युगोस्लाव्हियाचेविघटन होऊन क्रोएशिया, स्लोवेनिया, सर्बिया, बोस्निया आणि हर्झेगोविना, उत्तर मेसिडोनिया, माँटेनिग्रो ही राष्ट्रे उदयास आली.
★ सोव्हिएट रशियाच्या विघटनातून काही नवी राष्ट्रे
अस्तित्वात आली ती पुढीलप्रमाणे :आर्मेनिया, मॉल्डोव्हा, एस्टोनिया, लाटव्हिया,लिथूआनिया, जॉर्जिया, ॲझरबैजान, ताजिकिस्तान, किरगिझस्तान, बेलारुस, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन,कझाकस्तान आणि रशिया.
अस्तित्वात आली ती पुढीलप्रमाणे :आर्मेनिया, मॉल्डोव्हा, एस्टोनिया, लाटव्हिया,लिथूआनिया, जॉर्जिया, ॲझरबैजान, ताजिकिस्तान, किरगिझस्तान, बेलारुस, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन,कझाकस्तान आणि रशिया.
★ स्वशासनाच्या हक्कावर आधारलेल्या वांशिक राष्ट्रवादाला अनुसरून नव्या राज्यांच्या निर्मितीचाप्रवाह जगाच्या इतर भागांमध्येही दिसून आला. काही नवे देश जे स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आलेते होते-
● पूर्व तिमोर (इंडोनेशियापासून स्वातंत्र्य)
● एरिट्रिया (इथियोपियापासून स्वातंत्र्य)
● दक्षिण सुदान (सुदानपासून स्वातंत्र्य)
आजही वांशिक राष्ट्रवादावर आधारित स्वातंत्र्याच्या मागण्या होत आहे ◆कॅटलोनिया (स्पेनपासून स्वातंत्र्य हवे आहे.)
◆ कोसोवो (सर्बियापासून स्वातंत्र्य हवे आहे.
◆युरोपातील काही देशांनी कोसोवोचा स्वतंत्र देशाचा
दर्जा मान्य केला आहे.)
दर्जा मान्य केला आहे.)
◆ चेचन्या (रशियापासून स्वातंत्र्य हवे आहे.)
एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय
१९९० मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करून कुवेतच्या भूप्रदेशावर ताबा मिळवला. याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले.संयुक्त राष्ट्रांने या प्रकरणाची दखल घेत यावर चर्चा केली. इराक विरुद्धच्या कारवाईत पुढाकार घेत अमेरिकेने एका बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केले. या युद्धात कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका केली. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. बुश (सिनियर) यांच्या मते हा एक नैतिक विजय होता. या नव्या जागतिक परिस्थितीला ‘New World Order’ अशी संज्ञा वापरली गेली. अमेरिकेच्या या कृतीला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळाला. यात सोव्हिएट रशिया, चीन, नाटो मधील सहभागी देश, इस्राएल आणि अरब देशांमध्ये सौदी अरेबियाचादेखील समावेश होता. अंतर्गत समस्यांनी ग्रासलेल्या सोव्हिएट रशियाचे १९९१ मध्ये विघटन झाल्याने अमेरिके समोर फारसे वैचारिक आव्हान उरले नव्हते. कालांतराने ‘नवीन जागतिक व्यवस्था’ या संज्ञेचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी जोडून जागतिक पातळीवर अमेरिकन वर्चस्वाला आणि नेतृत्वाला सर्वमान्यता आहे असा घेण्यात आला. एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेची ही पहिलीच अभिव्यक्ती होती.
अमेरिका आता जगात एक प्रबळ राष्ट्र म्हणून प्रस्थापित झाले होते. अमेरिकेच्या या वर्चस्वाला राजकीय आणि आर्थिक आयाम होते. राजकीयदृष्ट्या, पूर्व युरोपातील अनेक पूर्वाश्रमीच्या साम्यवादी राजवटींनी अमेरिकी उदारमतवादी-लोकशाही तत्त्वांवर आधारलेली शासनप्रणाली स्वीकारली. सुशासनाची संकल्पनासुद्धा लोकशाहीशी जोडली गेली. अनेक देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला.अमेरिकन वर्चस्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तिचे सॉफ्ट पॉवर. सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशांवर प्रभाव टाकणे म्हणजे सॉफ्ट पॉवर. हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो.
मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप
राष्ट्रांचे विघटन आणि नव्या राष्ट्रांचा उदय या प्रक्रिया नेहमीच शांततामय असतीलच असे नाही. उदा., युगोस्लाव्हियाच्या बोस्निया आणि हर्झेगोविना प्रांतांमध्ये प्रचंड प्रमाणात वांशिक हिंसाचार झाला. चेचन्या, पूर्व तिमोर आणि एरिट्रीया या प्रदेशांमध्ये देखील संघर्ष सुरू होता.या प्रसंगांमध्ये मानवी हक्कांच्या होत असलेल्या पायमल्लीमुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. एक महत्त्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्रे या देशांमध्ये हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न करते. शांतता रक्षण हे संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख कार्यांमधील एक कार्य आहे.शीतयुद्धोत्तर काळात संयुक्त राष्ट्रे युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशांत शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हस्तक्षेप सुरू ठेवतात, परंतु येथे या हस्तक्षेपाचे उद्दिष्ट केवळ चालू असणारे युद्ध थांबवणे हे नसून भविष्यात अशाप्रकारच्या संभाव्य युद्धांना आळा घालणे, शांतता प्रस्थापित करणे आणि पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे हे आहे. याच कारणांसाठी संयुक्त राष्ट्राने कबोंडिया, सोमालिया आणि युगोस्लाव्हिया या देशांमध्ये हस्तक्षेप केला.मानवी हक्कांबद्दलची वाढती जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये त्यांना मिळालले्या पाठबळामुळे ‘मानवतावादी हस्तक्षेप’ या हक्क संरक्षणाच्या नवीन संकल्पनेचा उदय झाला. १९९० चे दशक हे मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणावा लागेल.
दहशतवाद
11 सप्टेंबर 2001रोजी झालेल्या न्यूयॉर्क ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन डी. सी. मधील पेंटागनवरील हल्ल्याने (जो 9/11 चा हल्ला म्हणून ओळखला जातो) दहशतवादाचे एक नवे रूप जगासमोर आले. जसमाजात भीती निर्माण करून राजकीय, धार्मिक आणि वैचारिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या हेतूने चालविलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय. साधारणपणे सरकारी संस्था आणि अधिकारी यांना प्रामुख्याने लक्ष्य केले जाते.
1972 मध्ये म्युनिक येथे इस्राएलच्या ऑलम्पिक संघावर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आधुनिक दहशतवादाचे पहिले उदाहरण म्हणता येईल. त्यानंतर दहशतवादी संघटना विमान अपहरणे, बॉम्बस्फोट आणि राजकीय नेत्यांची हत्या अशा मार्गांचा वापर करू लागले. पारंपरिक दहशतवाद हा मुख्यतः सरकारी संस्थांना लक्ष्य करत असे. दहशतवादी सहसा काही विशिष्ट लोकसमूहांच्या हक्कांसाठी लढत असत. दहशतवादी कारवायांचा अनेकदा अलगतावादी
(फुटीरतावादी) चळवळींशी संबंध येतो.आधुनिक दहशतवाद अनेक पातळ्यांवर वेगळाठरतो. आज दहशतवादी विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील विशिष्ट लोकसमूहांसाठी लढत नाहीत. दहशतवादी संघटना अमूर्त स्वरूपाच्या धार्मिक विचारसरणीने प्रेरित झालेल्या असतात, त्यांचा लढा अमूर्त स्वरूपाची धार्मिक ध्येये साध्य करण्यासाठी असतो. त्यासाठी वैश्विक पातळीवर योजना राबवल्या जातात. 9/11च्या हल्ल्यांनंतर त्याच्याशी साधर्म्य असलेले हल्ले बाली (2002), माद्रिद (2004), लंडन (2005) आणि मुंबई (2008) मध्ये घडवून आणले गेले.